महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये 24 तासात आढळले १८९ नवे रुग्ण - palghar corona update

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी वसई-विरारमध्ये १८९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील प्रशानाच्या चिंतेत भर पडली आहे.

palghar corona news
वसई-विरारमध्ये 24 तासात आढळले १८९ नवे रुग्ण

By

Published : Jul 31, 2020, 9:02 AM IST

पालघर -वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी वसई-विरारमध्ये १८९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील प्रशानाच्या चिंतेत भर पडली आहे.

गुरुवारी दिवसभरात ११६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचारादरम्यान ३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात १८९ रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ११ हजार ८३४ वर पोहोचली आहे.

वसई-विरारमध्ये आतापर्यंत एकूण २४२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तर ७ हजार ७५८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ३ हजार ८३४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे.

दिवसेंदिवस ग्रामीण भागातील बाधितांच्या संख्येत देखील भर पडत आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि डहाणू तालुक्यांमध्ये संस्थात्मक क्वारन्टाइन सेंटर वाढवण्याची मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details