पालघर/विरार - विरारमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाने बिलाच्या भीतीने रुग्णालयातील बाथरूमच्या खिडकीतून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. १४ एप्रिल रोजी या रुग्णाला कोरोनावरील उपचारासाठी विरार पूर्वेच्या वेलक्युअर या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र काल जेव्हा या रुग्णाला आपल्या बिलाची किंमत अडीच लाखांच्या घरात असल्याचे कळल्यानंतर त्याने रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
अबब! अडीच लाख बिल, आकडा ऐकून कोरोना रुग्णाने बाथरूमच्या खिडकीतून मारली उडी - पालघर कोरोना रुग्णसंख्या
विरारमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाने बिलाच्या भीतीने रुग्णालयातील बाथरूमच्या खिडकीतून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. १४ एप्रिल रोजी या रुग्णाला कोरोनावरील उपचारासाठी विरार पूर्वेच्या वेलक्युअर या खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
या रुग्णाने बाथरूमला जात असल्याचा बहाणा करून पहिल्या मल्यावरील बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून खाली उडी घेतली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत त्याचा जीव बचावला. मात्र या प्रकाराबाबत रुग्णालयाच्या डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोपांचे खंडन करून हा रुग्ण दारू पिण्यासाठी रुग्णालयाबाहेर पडण्याची धडपड करत असल्याचे कारण दिले आहे.
सर्वाधिक वाचली गेलेली बातमी- निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO