महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसईत काँग्रेसला धक्का; विजय पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश, विधानसभा लढणार? - विजय पाटील बातमी

वसई विधानसभेतून आमदारकी लढवण्यास बऱ्यापैकी इच्छुक असल्याने पाटील यांनी अखेर शिवसेना पक्षात प्रवेश करत सर्वांना धक्का दिला.

विजय पाटील यांचा शिवसेना पक्ष प्रवेश

By

Published : Sep 13, 2019, 10:16 PM IST

Updated : Sep 14, 2019, 2:08 AM IST

पालघर - वसई तालुक्यातील काँग्रेसला आणखी धक्का बसला आहे. काँग्रेसचे राज्य सचिव विजय पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गुरुवारी 'मातोश्री'वर काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून पाटील हे वसई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विजय पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश, विधानसभा लढणार?

हेही वाचा - प्रदीप शर्मा शिवसेनेत, पोलीस खात्यात चकमक दाखवल्यानंतर राजकारणात चमकणार?

पाटील हे वसईतील एक उद्योजक असून स्वच्छ प्रतिमेचा व शांत, संयमी असा राजकीय चेहरा आहेत. ते वसईतील प्रभावी राजकीय नेते असून आग्री, वाढवळ, ख्रिश्चन या समुदायांचा त्यांना चांगला जनाधार आहे. अनेक महिन्यांपासून ते पालघर व ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते, त्यातच ते वसई विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवण्यास बऱ्यापैकी इच्छुक असल्याने पाटील यांनी अखेर शिवसेना पक्षात प्रवेश करत सर्वांना धक्का दिला.

Last Updated : Sep 14, 2019, 2:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details