विरार :एका नामांकित कंपनीच्या दुधाच्या पॅकेटमध्ये झुरळ ( Cockroach in milk bag ) आढळल्याची तक्रार विरारमध्ये एका ग्राहकाने उघडकीस आला आहे.( milk bag ) या प्रकारबाबत ठाणे अन्न,औषधं विभागाला ( Thane Food and Drug Department ) कळवल्याची माहिती तक्रारदाराने दिली होती.
Cockroach In Milk Bag : दुधाच्या पिशवीत झुरळ निघाल्याची तक्रार शहानिशा केल्यावर निघाला शाईचा डाग - Good Morning Company Milk Company
विरारमध्ये एका ग्राहकाने दुधाची बॅग खरेदी केल्यावर त्यात झुरळ ( Cockroach in milk bag ) असल्याची तक्रार अन्न, औषधं विभागाला ( Thane Food and Drug Department ) विभागाकडे केली. नंतर शहानिशा केल्या नंतर तो झुरळ नसून शाईचा डाग असल्याचे समोर आल्याने तक्रार कर्त्याने तक्रार वापस घेतली आहे.
विरार पूर्वेच्या चंदनसार रोडवरील कातकरी पाडा येथे राहणारे ज्ञानदेव खरे यांनी दुधाची एक लिटरचे पॅकेट दुकानातून विकत घेतले होते. मात्र या पॅकेटमध्ये काळ्या रंगाचे झुरळ तरंगताना निदर्शनास आल्याची तक्रार करत त्यांनी दुकानदाराच्या मदतीने दूध वितरित करणाऱ्या एजन्सीशी संपर्क केला होता. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची माहिती ठाणे अन्न, औषध प्रशासन विभागाला दिली होती.
दूध ग्राहकाने झुरळ असल्याची आधी तक्रार केली होती. मात्र, नंतर शहानिशा केल्यावर तो झुरळ नसून शाईचा डाग असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तक्रारकर्त्याने दूध कंपनीला माफीनामा सादर केला आहे. तसेच कंपनीची नाहक बदनामी झाल्याबद्दल माफी मागितली आहे. दुधाच्या पिशवीची शहानिशा केल्यानंतर दुधात कोणताही किडा दिसला नाही. नजर चुकीमुळे आपण पिशवीवर असलेल्या शाईचा डागाला झुरळ सदृश्य कीडा समजलो. या संदर्भात कोणतीही तक्रार नाही. असे सांगत ज्ञानदेव खरे यांनी माफीनामा लिहून दिल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.