पालघर- जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा भागात रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे विरारहुन पालघरच्या दिशेने येणारी तसेच मुबाईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेची वाहतूक ठप्प होती.
केळवे रोड स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी दिले जेवण हेही वाचा- रेल्वे प्रवाशांसाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था
यावेळी केळवे रोड स्थानकात अडकलेल्या इंदोर- कोच्चीवेली एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला. डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, हॉटेल निमा, हॉटेल गारवा, रूचिरा महिला बचतगट, युवक मित्र मंडळ केळवे यांनी केळवे रोड स्थानकात अडकलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी मोफत चहा, नाष्टा, पाणी व जेवणाची सोय केली.
हेही वाचा- देव तारी त्याला कोण मारी ! मालगाडीचे डबे अंगावरून गेले, तरीही त्या राहिल्या जीवंत
अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या पालघर, बोईसर, केळवे रोड स्थानकांवर तासंतास उभ्या होत्या. रेल्वे रूळांवर साचलेल्या पाण्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे तासंतास रेल्वे स्थानकांत अडकून पडलेल्या या प्रवाशांचे हाल झाले.