पालघर - (वाडा) जिल्ह्यातील विक्रमगड येथे 2018 मध्ये मोठा पूर आला होता. यात मोठी जीवितहानी झाली होती. जव्हार तालुक्यातील घिवंडा येथील मोतीराम किसन गवळी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांच्या पत्नी सीता मोतीराम गवळी यांना दोन लाख रुपयांचा मदतीचा धनादेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 12 जुलै रोजी जव्हार येथे देण्यात आला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते 2018 च्या आपत्तीग्रस्त नातेवाईकांना धनादेश - आपत्तीग्रस्त नातेवाईकांना धनादेश
विक्रमगड येथे 2018 मध्ये मोठा पूर आला होता. यात मोठी जीवितहानी झाली होती. जव्हार तालुक्यातील घिवंडा येथील मोतीराम किसन गवळी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
त्याचबरोबर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मयत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यात केळघर येथील वनिता वसंत शिंदे, किरमिरा येथील लता लहानू खुरकुटे, अनंतनगर येथील सावित्री सुनिल डोके आणि शेवंती रामु भुरकुड यांचा समावेश होता.
विक्रमगड तालुक्यात 2018 मध्ये पुरात वाहून गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. यामध्ये कावळे येथील बुधीबाई गणपत भोये आणि मलवाडा-म्हसेवाडा येथील लता माधव चव्हाण यांचा समावेश होता. तर मोखाडा येथे किसन गोविंद मोहरे यांना देखील दोन लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.