पालघर- संध्याकाळी लग्न सोहळ्यासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व पोळ्याची माळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबवल्याची घटना वसईत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
वसईत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले; घटना सीसीटीव्हीत कैद - चोरी सीसीटीव्ही
संध्याकाळी लग्न सोहळ्यासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व पोळ्याची माळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबवल्याची घटना वसईत घडली आहे.
हेही वाचा -'गरज पडल्यास सेना-राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोबत घेऊ'
वसईतील जी.जी.काॅलेज येथे रात्री आठ वाजता ही घटना घडली आहे. सदर महिला आणखीन एका महिलेसोबत नातेवाईकांकडे लग्नासाठी जी.जी.काॅलेज येथील मैदानावर जात होती. यावेळी काॅलेजच्या गेटवर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व पोळ्याची माळ असा साडेतीन लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. काॅलेजच्या मुख्य गेटवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.