पालघर - कार आणि दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. शिरसाड-अंबाडी मार्गावरील शिरवली वळण रस्त्यावर अपघात घडला.
शिरसाड-अंबाडी मार्गावर दुचाकीला कारची धडक; एक गंभीर जखमी
वसई पूर्वेतील भागातून शिरसाड अंबाडी राज्यमार्ग गेला आहे. या मार्गावरील शिरवली येथे असलेल्या वळणावर कार आणि दुचाकी यांची धडक झाली. या धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्यापासून दूर फेकला गेला. त्यामुळे चालक गंभीर जखमी झाली आहे.
दुचाकीचा अपघात
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेतील भागातून शिरसाड अंबाडी राज्यमार्ग जातो. या मार्गावरील शिरवली येथे असलेल्या वळणावर गुरुवारी कार आणि दुचाकी यांची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यापासून दूर फेकला गेल्यामुळे गंभीर जखमी झाला.
गणेश तुकाराम कांबळे (वय,५२ रा. चारकोप) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. तसेच, अपघातानंतर घटनास्थळावरून कार चालक फरार झाल्याचे सांगण्यता येत आहे. जखमीला कांदिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.