पालघर- पालघरमध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी झाले आहे. त्यामुळे केळवे रोड येथे या पाण्यामध्ये एक स्विफ्ट कार पाण्यामध्ये वाहून जात होती. मात्र, स्थानिकांनी कारमधील 4 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच वाहून जाणारी कारही पाण्याबाहेर काढण्यात नागरिकांना यश आले आहे.
पावसाच्या पाण्यात वाहू लागली कार, स्थानिकांनी वाचवला प्रवाशांचा जीव
मुंबई येथून केळवे येथे आलेल्या एका दाम्पत्याला केळवे रोड स्थानकानजीक असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाम्पत्याची कार पाण्यामध्ये अडकून पडले.
मुंबई येथून केळवे येथे आलेल्या एका दाम्पत्यांला केळवे रोड स्थानकानजीक असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाम्पत्याची कार पाण्यामध्ये अडकून पडले. तर पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्यासोबत कार वाहत जात होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी कारमधील दाम्पत्याला व 2 लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले.
दरम्यान, पावसाचे दिवस असून नदी- नाल्यांना पूर येत आहे. त्यामुळे गाडी पार करताना आपल्या आयुष्याशी खेळू नका, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.