महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोईसर-खैरापाडा येथे टँकर वेल्डिंग करताना स्फोट; वेल्डर ५२ टक्के भाजला - Tanker Explosion Boisar-Khairapada Palghar

गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद वसीमला बोईसर येथील तुंगा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ऐरोली येथील रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे.

जखमी झालेला मोहम्मद वसीम

By

Published : Sep 22, 2019, 12:33 PM IST

पालघर- बोईसर-खैरापाडा येथे टँकर वेल्डिंग करताना स्फोट झाला. या स्फोटात वेल्डर ५२ टक्के भाजला असून त्याच्या हाताचा एक अंगठाही तुटला आहे. मोहम्मद वसीम (३५) असे स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

स्फोट झालेल्या ठिकाणा जवळील दृश्ये

गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद वसीमला बोईसर येथील तुंगा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ऐरोली येथील रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी बोईसर पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

हेही वाचा-पालघरमध्ये कार अन् कंटेनरचा अपघात, २ जण गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details