पालघर- वसई-विरार महानगरपालिकेच्या अनागोंदी व ढिसाळ कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, आगरी सेना, श्रमजीवी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना 'महायुती'च्या माध्यमातून एकत्र येत शुक्रवारी विरार येथील पालिका मुख्यालयावर मोर्चा काढत मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे प्रतिकात्मक श्राद्ध घालण्यात आले.
यावेळी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी ही महापालिका बरखास्त करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याचेही सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर, आगरी सेनेचे जिल्हाप्रमुख जनार्दन पाटील, तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर, तालुकाप्रमुख जितेंद्र शिंदे, भाजप जिल्हाप्रमुख सुभाष साटम, भाजपचे मनोज पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे, प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव, प्रवीण म्हाप्रळकर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.