पालघर- जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दुपारी 2.35 मिनिटांनी 5. 88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावधान ! पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर उसळणार 5.88 मी. उंचीच्या लाटा; किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा - जिल्ह्याच्या किनारपट्टीवर
जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दुपारी 2.35 मिनिटांनी 5. 88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात 3 व 4 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपूर्ण पालघर जिल्ह्यात 157 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुपारी 1 वाजतापासून जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी व कवडास या दोन धरणातून 42500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.