पालघर -जिल्ह्यातील वसईतील भार्गवी प्रशांत संखे हिला क्रिडाक्षेत्रातील प्रतीष्ठेचा भारतीय खेल पुरस्कार-2019 दिल्ली येथे एका समारंभात देण्यात आला आहे.
भारतीय खेल पुरस्कार समितीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येत असतो. भार्गवीला हा पुरस्कार मिळाल्यामुळे तीच्यावर सर्व स्तरावरून सद्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लहान वयापासूनच कराटे आणि किकबॉक्सिंगमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर भार्गवीने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सुवर्णपदकांवर नाव कोरले आहे. तिच्या क्रीडाक्षेत्रातील कामगिरीची दखल घेत 'भारतीय खेल पुरस्कार समिती'ने 'भारतीय खेल पुरस्कार -2019' ह्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी तिची निवड केली होती. 20 ऑक्टोबर रोजी भारतीय संविधान क्लब, नवी दिल्ली येथे झालेल्या ह्या सन्मान सोहळ्यामध्ये भारतीय ऑलिम्पिक अससोसिएशनचे उपाध्यक्ष कुलदीप वत्स ह्यांच्या हस्ते भार्गवीला भारत सरकारद्वारे दिला जाणारा बहुमानीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भारत गौरव संदेश यादव ( सदस्य- रेल्वे मंत्रालय, टेलीकम्युनिकेशन मंत्रालय, भारत सरकार), भारत गौरव सुशीलकुमार, पायल यादव ( सदस्य- दूरसंचार मंत्रालय, भारत सरकार), पूजा मिश्रा (राष्ट्रीय मंत्री एवं मीडिया प्रभारी बीजेपी महिला मोर्चा), विरेंद्र सिंह (अर्जुन पुरस्कार विजेता), अशोक ध्यानचंद (अर्जुन पुरस्कार विजेता), इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.