पालघरMahayuti Meeting In Palghar:येथे आज आयोजित महायुतीच्या सभेला बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे महायुतीतील एकजुटीचा फोलपणा स्पष्ट दिसून येत होता. बहुजन विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यास महायुतीचं नुकसान असल्याची चर्चा सुरू आहे. (MP Shrikant Shinde) हा मतदारसंघ शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे असून येथे बहुजन विकास आघाडीची मते अधिक आहेत. येथून बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात उभा राहतो की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. बहुजन विकास आघाडी रिंगणात राहिल्यास महायुतीचं नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची समजूत कशी काढायची, असा प्रश्न आहे. (MP Rajendra Gavit)
खासदार शिंदे-राणे यांची विधाने परस्परविरोधी:शिवसेनेच्या शिंदे गटाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याचा आहे. येथून पुन्हा खासदार राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी मिळणार असून ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र या मतदारसंघातून भाजपाचाच खासदार होईल, असा दावा केला. पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण? याबाबतचा संभ्रम कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात अजूनही कायम आहे. महायुतीने उशिरा उमेदवार दिला तर तो जनतेला पसंत पडेल का? याबाबतही साशंकता आहे. त्यातच महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला बहुजन विकास आघाडी अजूनही महायुतीपासून फटकून राहत असल्यानं महायुतीत चिंता आहे.
पालघर मतदारसंघातील पक्षीय बलाबल:पालघर लोकसभा मतदारसंघात खासदार शिवसेनेचा आहे. या पक्षाचा या मतदारसंघात एक आमदार आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. एक आमदार माकप आणि एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचा सर्वपक्षीयांशी संबंध आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले असले, तरी पालघर लोकसभा मतदारसंघा बाबतचे पत्ते त्यांनी खुले केलेले नाहीत. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.