पालघर -जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयात महिला प्रसूतीगृहात बेबी कॉर्नर सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये बाळाची काळजी घेण्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा आणि महिलांसाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात आली आहे.
वाडा ग्रामीण रुग्णालयात बेबी कॉर्नरची स्थापना, गरोदर मातांसह बालकांना पुरवणार अत्याधुनिक सुविधा - वाडा पालघर
रुग्णालयात बेबी कॉर्नर सुविधा केंद्रामुळे येथे शस्त्रक्रिया देखील होणार आहे. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नसल्याने येथे शस्त्रक्रिया होत नव्हती. मात्र, खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून ही सुविधा दिली जाणार असल्याची माहिती यावेळी ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली.
वाडा ग्रामीण रुग्णालयात शहापूर, विक्रमगड, पालघर आणि मोखाडा भागातील बाहेरील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. तसेच गरोदर माता या रुग्णालयात प्रसूतीसाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी बेबी कॉर्नर सुविधा केंद्र उभारण्यात आले. यामध्ये गरोदर माता आणि तसेच तिच्या बाळांना सर्व वैद्यकीय सोईसुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच या केंद्रात नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती करण्यात येणार आहे. अत्याधुनिक सोईसुविधांमुळे बालमृत्यूमध्येही घट होणार असल्याची आशा केंद्राच्या उद्घाटनकर्त्या पालघर सिव्हील सर्जन कांचन वानेरे यांनी व्यक्त केली.
रुग्णालयात बेबी कॉर्नर सुविधा केंद्रामुळे येथे शस्त्रक्रिया देखील होणार आहे. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नसल्याने येथे शस्त्रक्रिया होत नव्हती. मात्र, खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून ही सुविधा दिली जाणार असल्याची माहिती यावेळी ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली. यावेळी वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.