महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये जमिनीच्या वादातून वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला

जमिनीच्या वादातून एका माथेफिरुने ६६ वर्षीय वयोवृद्धावर धारधार कोयत्याने हल्ला केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

attack-on-the-veteran-by-land-dispute
जमीनीच्या वादातून वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला

By

Published : Dec 14, 2019, 9:24 PM IST

पालघर- जमिनीच्या वादातून एक माथेफिरूने ६६ वर्षीय वयोवृद्धावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. विलास जोशी, असे जखमी वृद्धाचे नाव आहे. हल्लेखोर सुमीत चौधरी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

जमिनीच्या वादातून वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला

हेही वाचा -पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; घराच्या भितींना तडे

विरार पश्चिम डोंगरपाडा येथे राहणारे विलास जोशी यांचा शेजारीच राहणाऱ्या सुमीत चौधरीसोबत जमीनीवरून वाद होता. जोशी यांनी जागेच्या वादावरून सर्व स्तरावर अनेक तक्रारी केल्या होत्या. याच रागातून शुक्रवारी सायंकाळी विलास जोशी यांच्यावर आरोपीने धारदार कोयत्याने डोक्यात, हातावर व पायावर सपासप वार केले. यामध्ये जोशी गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- 'गरुडा डायकास्टिंग'मधील रासायनिक पदार्थ रस्त्यावर सोडले; कंपनी मालकासह तिघांवर गुन्हा दाख

ABOUT THE AUTHOR

...view details