महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एटीएम फोडण्याचे सत्र सुरूच, पालघरमध्ये अॅक्सिस बँकेच्या एटीएमवर चोरट्यांचा डल्ला

शहरातील पास्थळ येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे.

By

Published : Mar 1, 2020, 3:34 PM IST

एटीएम फोडण्याचे सत्र सुरूच
एटीएम फोडण्याचे सत्र सुरूच

पालघर -शहरातील पास्थळ येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. एटीएममधील रोख चोरून चोरटे पसार झाले आहेत. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

एटीएम फोडण्याचे सत्र सुरूच, पालघरमध्ये अॅक्सिस बँकेच्या एटीएमवर चोरट्यांचा डल्ला

बोईसर नजीक पास्थळ येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले आणि त्याचील रोख रक्कम घेऊन ते पसार झाले आहेत. एटीएमचा सुरक्षारक्षक गैरहजर असल्याने ही घटना घडली आहे. दरम्यान एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेराही ही बंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी अधिक तपास बोईसर पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details