महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

यावेळी 19 लाख 51 हजार 668 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 2 हजार 193 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर 14 हजार 114 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मतदानाला सुरुवात

By

Published : Oct 21, 2019, 8:25 AM IST

पालघर - राज्यात आज सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पालघर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली आहे. या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मतदानाला सुरुवात

हेही वाचा-अमोल यादवांच्या मेक इन इंडिया 'उड्डाणा'ला पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील

यावेळी 19 लाख 51 हजार 668 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 2 हजार 193 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर 14 हजार 114 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याखेरीज 3 हजार 960 पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व एसआरपीएफ या सहा कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.


ABOUT THE AUTHOR

...view details