महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजप सज्ज

2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या राजेंद्र गावितांना 1 लाख 4 हजार 392, तर बविआच्या बळीराम जाधव यांना 76 हजार 220 मते मिळाली होती. बविआला हा जोरदार धक्का समजला जातो. त्यामुळे बोईसर मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यास भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे हे इच्छुक आहेत. यावर पुढे श्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील, असे ते म्हणाले आहेत.

बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजप सज्ज

By

Published : Sep 23, 2019, 6:13 PM IST

पालघर - जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहे. विलास तरे हे येथून आमदार आहेत. युती झाली नाही तर भाजपकडून जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या राजेंद्र गावितांना 1 लाख 4 हजार 392, तर बविआच्या बळीराम जाधव यांना 76 हजार 220 मते मिळाली होती. बविआला हा जोरदार धक्का समजला जातो. त्यामुळे बोईसर मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यास भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे हे इच्छुक आहेत. यावर पुढे श्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील, असे ते म्हणाले आहेत.

बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजप सज्ज

या मतदारसंघात औद्योगिक वसाहत येत असल्याने येथे उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. बोईसर मतदारसंघातून आमदार विलास तरे हे दोन वेळा निवडून आले आहेत. हा बहुजन विकास आघाडीचा गड मानला जातो. विलास तरे पुर्वी शिवसेनेत असताना ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत होते. त्यांचा हा गड भेदण्यासाठी शिवसेना सुध्दा तयारीला लागली आहे. मागील तरे यांच्या विरोधात शिवसेनेकडून कमलाकर दळवी तर भाजपकडून जगदीश धोडी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, पुन्हा विलास तरेंनीच बाजी मारली होती. भाजपकडून जनाठें सोबतच सेनेकडून जगदीश धोडी यांचे नाव चर्चेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details