पालघर- सातपाटी जुना रोड काशी पाडा येथील अल्फामेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली यांचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.
अल्फामेटल कंपनीच्या मालकाचे दिवसाढवळ्या अपहरण - मालक
आरिफ मोहम्मद अली रिक्षातून जात असताना पांढऱया रंगाच्या स्कॉर्पिओमधून काहीजण उतरले. त्यांनी रिक्षातून जात असलेल्या अली यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.
आरिफ अली
दरम्यान, अजय मस्के याने अपहरण करताना वापरलेली गाडीची ओळख पटवली असून ती प्रशात संखे याची असल्याची माहिती दिली आहे. प्रशांत संखे हा अल्फामेटल कंपनीला मटेरिअल सप्लाय करण्याचे काम करतो. परंतु, अपहरण कोणत्या कारणामुळे करण्यात आले, हे अद्याप कळू शकलेले नाही.
Last Updated : May 10, 2019, 7:35 PM IST