वसई - ग्राहकांच्या जीवाशी जीवघेणा खेळ खेळला जात असल्याचे नुकतेच समोर आले आहे. वसईतील दोन डेअऱ्यांमध्ये बनावट आणि भेसळयुक्त पनीर बनवले जात होते, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या दोन्ही डेअरींवर बुधवारी छापा टाकला. येथून साडेसात लाख किमतीचे अडीच हजार किलो पनीर जप्त करण्यात आले
वसई विरार शहरातील अनेक उपहार गृहे, रिसॉर्ट आणि ढाब्यामध्ये हे बनावट पनीर वितरीत केले जात होते. चिंचोटी कामण रोडवर असलेल्या अजय आणि साईनाथ डेअरी या दोन ठिकाणी हे पनीर बनवले जात असे. तसेच, याठिकाणी अन्न सुरक्षेच्या कुठल्याही नियमांचे पालन केले जात नव्हते. अत्यंत अस्वच्छ वातावरणात पनीर बनविण्यात येत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.