पालघर - चोरीचा बनाव करून आपल्या पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्याम दीनदयाल गुप्ता (७०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या बुधवारी आरोपीने घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरले होते. तसेच त्यानंतर पत्नीची हत्या केली होती. विरारमधील चंदनसार येथील साहिल नगरमध्ये ही घटना घडली होती.
चोरीचा बनाव करून पत्नीची हत्या करणारा पती विरार पोलिसांच्या अटकेत - पालघर
गेल्या बुधवारी आरोपीने घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरले होते. तसेच त्यानंतर पत्नीची हत्या केली होती. विरारमधील चंदनसार येथील साहिल नगरमध्ये ही घटना घडली होती.
साहिल अपार्टमेंटमध्ये सदनिका क्रमांक ५ मध्ये राहणाऱ्या उमादेवी श्याम गुप्ता (५०) यांची बुधवारी संध्याकाळी चोरट्यांनी घरात चोरी करून हत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत त्यांचे पती यांनी विरार पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. विरार पोलिसांनी जबरी चोरी आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. उमादेवी यांचे पती श्याम गुप्ता आणि त्यांच्या मुलीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. त्यावेळी उमादेवींचे त्यांचे पती श्यामसोबत पटत नाही. तसेच दररोज दोघांमध्ये भांडणे होत होती.श्याम यांनी पत्नीकडे ठेवायला दिलेले पैसेही खर्चासाठी तसेच कर्जाचा हप्ता भरण्यासाठी त्या देत नसल्याचे समोर आले. तसेच तुझ्यामुळे मला आपत्य होत नाही, असे अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे श्याम यांनी पोलिसांना सांगितले.
पत्नीबद्दलचा हाच राग मनात धरून बुधवारी श्यामने घरातील लोखंडी फ्लॉवरपॉट आणि दगडी वरवंट्याने पत्नीच्या डोक्यात मारून तसेच तिचे डोके भिंतीवर आपटून हत्या केली. घरात चोरट्यांनी चोरी करून हत्या केल्याचा बनाव केल्याचेही कबूल केले. घरातील चोरी झालेले रोख रक्कम आणि दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.