महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टेम्पो-बस अपघातात टेम्पो पुलाखाली पडला; जीवितहानी नाही

वाडा-खोडाळा रस्त्यावर स्थानिक आगारातील बस व टेम्पो यांमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये टेम्पो पुलाच्या खाली पडला असून, कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

वाडा -खोडाळा रस्त्यावर स्थानिक आगारातील बस व टेम्पो यांमध्ये अपघात झाला

By

Published : Oct 1, 2019, 11:26 AM IST

पालघर : वाडा-खोडाळा रस्त्यावर बस व टेम्पो यांच्यामध्ये अपघात झाला आहे. यामध्ये टेम्पो पुलाच्या खाली पडला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणात बसचा भरधाव वेग अपघाताला कारणीभूत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. या अगोदर तालुक्यातील जांभुळपाडा येथे भरधाव बस गतिरोधकावर आदळून 65 प्रवासी जखमी झाले होते.

वाडा तालुक्यातील दुर्गम भागातील वाडा-खोडाळा हा नव्याने रस्ता तयार झाला आहे. याच रस्त्यावर 30 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास टेम्पो व बसचा अपघात झाला असून, अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा -जलसंधारण मंत्री सावंतांच्या गाडीने तरुणास चिरडले; संतप्त जमावाने फोडली गाडी

वाडा बस आगारातील बसेस अपघाताच्या घटना जांभुळपाडा, मांडवा, विक्रमगड तालुक्यातील वसुरी रस्त्यावरील शेलपाडा अशा ठिकाणी आजवर झाल्या आहेत. वसुरी येथील अपघातात वयोवृद्ध पादचाऱ्याला उडवल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details