पालघर- जिल्ह्यात 200 रुपयांच्या एकाच सिरीयल नंबरच्या नोटा वापरुन दुकानदारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, दुकानदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एक महिला आणि एक ओला चालकाला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एकाच नंबरच्या नोटा वापरून दुकानदारांची फसवणूक; दोघे पालघर पोलिसांच्या ताब्यात - palgher crime news
पालघर येथे एक महिला आणि एक ओला कार ड्रायव्हर 200 रुपयांच्या नोटा देऊन वेगवेगळ्या दुकानांमधून 20 ते 30 रुपयांचे सामान खरेदी करत होते. उमरोळी येथील एक दुकानदाराने बारकाईने नोटांकडे पाहिले असता सर्व नोटा एकाच सिरीअलच्या असल्याचे लक्षात आले.
एकाच सिरीयल नंबरच्या नकली नोटा वापरून फसवणूक:-
पालघर येथे एक महिला आणि एक ओला कार ड्रायव्हर 200 रुपयांच्या नोटा देऊन वेगवेगळ्या दुकानांमधून 20 ते 30 रुपयांचे सामान खरेदी करत होते. उमरोळी येथील एक दुकानदाराने बारकाईने नोटांकडे पाहिले असता सर्व नोटा एकाच सिरीअलच्या असल्याचे लक्षात आले.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस-
त्यानंतर दुकानदाराने सतर्कता दाखवत नागरिकांच्या मदतीने महिला आणि ड्रायव्हर यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.