पालघर - एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन हात करणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर ताण असताना आता पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वावेघर येथे डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. यातील काही रुग्णांचे रक्त तपासणी नमुने डहाणू येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. यातील दोन पॉझिटिव्ह रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपुल्ले यांनी बोलतना दिली. तर डेंग्यूबाबत आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम उघडली आहे.
पालघरमध्ये डेंग्यूचे दोन रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क; ग्रामस्थांनी हाती घेतली स्वछ्ता मोहीम - पालघरमध्ये डेंग्यूचा फैलाव
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वावेघर भागात 14 एप्रिलला पहिला डेंग्यूचा रुग्ण आढळला होता. यात त्या ठिकाणी रक्त तपासणी केली असता तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपुल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 11 लोक एनएस 1 पॉझिटिव्ह म्हणजे प्राथमिक चाचणीत पॉझिटिव्ह आले, त्यापैकी 6 लोकांचे रक्ताचे नमुने निश्चित निदानासाठी डहाणूला पाठवले त्यापैकी दोन रुग्णांचे डेंग्यूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, उर्वरित 4 निगेटिव्ह आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वावेघर भागात 14 एप्रिलला पहिला डेंग्यूचा रुग्ण आढळला होता. यात त्या ठिकाणी रक्त तपासणी केली असता, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपुल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 11 लोक एनएस 1 पॉझिटिव्ह म्हणजे प्राथमिक चाचणीत पॉझिटिव्ह आले, त्यापैकी 6 लोकांचे रक्ताचे नमुने निश्चित निदानासाठी डहाणूला पाठवले त्यापैकी दोन रुग्णांचे डेंग्यूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, उर्वरित 4 निगेटिव्ह आले आहेत. यातील 11 पैकी 2 रुग्ण हे वाडा तालुक्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, इतर घरी असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ज्या भागात डेंग्यू रुग्ण आढळले आहेत त्या ठिकाणी जनावरांचे गोठे, पाण्याने भरलेल्या कुंड्या, प्लास्टिक बाटल्या आढळल्याने तेथे ग्रामपंचायत व गावकरी यांच्या सहकार्याने या परिसराची साफसफाई करण्यात येत आहे. तशी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी बुरपुल्ले यांनी बोलतांना दिली.