महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसईत तलावात बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू - कृणाल गुप्ता

कृणाल गुप्ता हा पापडी येथील बौद्धवाडीत आपल्या आई-वडिलांसोबत राहात होता. शनिवारी दुपारी तो त्यांच्यासोबत तलावावर कपडे धुण्यासाठी गेला असता, पाय घसरून तलावात पडला.

कृणाल गुप्ता

By

Published : Sep 15, 2019, 7:40 AM IST

पालघर- वसईमध्ये 12 वर्षीय मुलाचा पापडी तलावात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. आई-वडिलांसोबत तलावावर कपडे धुण्यासाठी गेला असताना हा मुलगा तलावात पडला. कृणाल गुप्ता, असे या मृत मुलाचे नाव आहे.

हेही वाचा - गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले चार जण पूर्णा नदीत गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडला

याबाबत अधिक माहिती अशी की, कृणाल गुप्ता हा पापडी येथील बौद्धवाडीमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहात होता. शनिवारी दुपारी तो त्यांच्यासोबत तलावावर कपडे धुण्यासाठी गेला असताना पाय घसरून तलावात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.

हेही वाचा - राजस्थानात एकाच कुटुंबातील तिघींचा नदीत बुडून मृत्यू

स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती वसई-विरार अग्निशमन दल व वसई पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत कृणालचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कृणालचा मृतदेह सापडला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details