महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमधील 11,831 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

राज्य सरकारने जाहीर केलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा जिल्ह्यातील 11,831 शेतकऱ्यांना होणार आहे.  जिल्ह्यात जळपास 1 लाख 45 हजार शेतकरी असून यापैकी 11 हजार 831 शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.

palghar district collector
पालघरमधील 11,831 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By

Published : Jan 10, 2020, 1:05 PM IST

पालघर - राज्य सरकारने जाहीर केलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा जिल्ह्यातील 11,831 शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यात जळपास 1 लाख 45 हजार शेतकरी असून यापैकी 11 हजार 831 शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफीची रक्कम एकूण 83 कोटी रुपये असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालघरमधील 11,831 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान वितरित होत असलेल्या तसेच 31 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. या कर्जमाफीत विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, सरकारी कर्मचारी, पंचवीस हजारांपेक्षा अधिक पेन्शन घेणारे कर्मचाऱ्यांना तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे.

हेही वाचा :"जर हवा असेल सात बारा कोरा तर उद्या महाराष्ट्र बंद करा"

मे महिन्यापर्यंत संबंधित कर्जमाफी होणार असून जून महिन्यात शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेता येणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक नसतील त्यांनी त्वरित लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंबंधी अधिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details