पालघर - संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. सोमवारी वसई-विरारमध्ये तब्बल 183 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
वसई-विरारमध्ये 11 हजार 373 आकडा पार;आज 183 नवे रुग्ण...
संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा ११ हजार पार झाला आहे. आज १८३ नवीन रुग्ण मिळाले असून ५ रुग्णांचा मृत्यू झालाय.
सोमवारी दिवसभरात उपचारादरम्यान 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाच दिवसात 183 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 11 हजार 373 वर पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 232 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तर आतापर्यंत 7 हजार 408 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3 हजार 733 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.