महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये कोरोनाचे 103 नवे रूग्ण; तर 11 जणांचा मृत्यू

वसई-विरार महानगरपालिका हद्दीत आज दिवसभरात कोरोनाचे 103 नवे रूग्ण आढळले तर 11 जणांचा मृत्यू झाला. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे वसई-विरारमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 41 झाली आहे. काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 86 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

Vasai-Virar Municipal Corporation
वसई-विरार महानगरपालिका

By

Published : Jun 20, 2020, 9:05 PM IST

पालघर: वसई-विरारमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत येथील कोरोना रुग्णांचा आकडा दोन हजारच्या वर गेला आहे. महानगरपालिका हद्दीत आज दिवसभरात कोरोनाचे 103 नवे रूग्ण आढळले तर 11 जणांचा मृत्यू झाला. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे वसई-विरारमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 41 झाली आहे. काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 86 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

आज उपचारा दरम्यान 11 रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृतांची संख्या 85 झाली आहे. आत्तापर्यंत 1 हजार 180 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 776 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल देखील शहरात कोरोनाचे 93 रूग्ण आढळले होते तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून काल दिवसअखेर 5 हजार 893 मृत्यूंची नोंद झाली. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 24 हजार 331 वर गेली आहे. यातील एकूण 55 हजार 665 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 62 हजार 773 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details