महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: 'ती' पैज कोण होईल खासदार यावरच, आरोपी जेरबंद - ईटीव्ही भारत

जुगारी लोकांवर कारवाई करण्यासंदर्भात ईटीव्ही भारतने पोलिसांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार ईटीव्ही भारतच्या बातमीची दाखल घेऊन उस्मानाबादमधील पैज लावणाऱ्या आरोपींविरुद्द आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: 'ती' पैज कोण होईल खासदार यावरच, आरोपी जेरबंद

By

Published : Apr 30, 2019, 11:37 PM IST

उस्मानाबाद- निवडणूकीमध्ये कोण निवडूण येणार, यावर पैजा लावणे किंवा सट्टा लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा जुगारी लोकांवर कारवाई करण्यासंदर्भात ईटीव्ही भारतने पोलिसांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार ईटीव्ही भारतच्या बातमीची दाखल घेऊन उस्मानाबादमधील पैज लावणाऱ्या आरोपींविरुद्द आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तर युतीकडून ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी निवडणूक लढवली. १८ एप्रिलला या ठिकाणी मतदान झाल्यानंतर कोणता उमेदवार निवडून येणार? यावर लोकांनी पैजा लावण्यास सुरवात केली.

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: 'ती' पैज कोण होईल खासदार यावरच, आरोपी जेरबंद

यामध्ये शंकर मोरे (राघूची वाडी) आणि बाजीराव करवर (राघूची वाडी) यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून पहिल्यांदा, अशी पैज लावली. त्यानंतर हनुमंत नन्नवरे आणि जीवन शिंदे यांनीही शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर कोण निवडूण येणार यासाठी पैज लावली होती. या पैजेचे लोण महाराष्ट्रभर पसरत होते. त्यामुळे याप्रकणी ईटीव्ही भारतने या पैजेची दखल घेत २३ एप्रिल रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत आता जुगारी लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details