उस्मानाबाद - काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. हे सर्व नेते मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात देखील आहेत. येत्या काळात सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसले इतके प्रवेश भाजपमध्ये होणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. विखे पाटील सपत्नीक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; भाजप प्रवेश सर्वांना धक्का देणारे ठरतील - विखे - राधाकृष्ण विखे पाटील
भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या निश्चित सांगता येणार नाही. मात्र, ही संख्या मोठी आहे. कुणासाठीही 'नो-एन्ट्री'चा बोर्ड लावण्यात आला नसल्याचे विखे म्हणाले.
भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या निश्चित सांगता येणार नाही. मात्र, ही संख्या मोठी आहे. कुणासाठीही 'नो-एन्ट्री'चा बोर्ड लावण्यात आला नसल्याचे विखे म्हणाले. तसेच राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार यावे आणि राज्यातील दुष्काळ कमी व्हावा, यासाठी तुळजाभवानीला साकडे घातले असल्याचे विखेंनी सांगितले.
देशाच्या काँग्रेस नेतृत्वावर कधीही नाराजी नव्हती. मात्र, राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर नाराजी होती. त्यांनी माझे ऐकले असते तर काँग्रेसवर ही वेळ आली नसते. मात्र, आता चिंतन करण्याची वेळ निघून गेल्याचे विखे पाटील म्हणाले.