उस्मानाबाद- तुळजापूर तालुक्यातील वडगाव (लाख) या गावातील ग्रामस्थांनी आज तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. या गावच्या जवळून तुळजापूर-लातूर महामार्गाचे काम सुरू असून या ठिकाणी बायपास रस्ता तयार करावा, तसेच रस्त्यावर दुभाजक उभारून गावातील नागरिकांसाठी मार्ग मोकळा करावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
वडगाव ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी तुळजापूर-लातूर महामार्गावर रास्ता रोको - highway
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (लाख) येथील ग्रामस्थांनी आज तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले.
या महामार्गावर बायपास रस्ता न केल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावच्या उत्तर दिशेला अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यामुळे या महामार्गावरुन शेतावर जाण्या-येण्यासाठी त्यांना अ़़डचण होत आहे. तर वडगावपासून जवळपास ३० गावांनाही या महामार्गामुळे संपर्कासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे वडगाव लाख येथे बायपास रस्ता तयार करावा, तसेच रस्त्यावर दुभाजक उभारावे, प्रवाशी थांबा, विद्युतीकरण आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
येत्या १५ दिवसात ही समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला.