उस्मानाबाद - गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे अनेक लोकांच्या घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. अवेळी वादळवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गावातील अनेक लोकांच्या घरांची पडझड झाली आहे.
वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड - अवकाळी पाऊस
पळसप येथील अफसर करीम शेख यांचे 10 ते 12 माणसाचे कुटुंब आहे रात्री झालेल्या पावसामुळे त्यांचे राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन बांधकामाचीही मोठी पडझड होऊन नुकसान झाले आहे.
पळसप येथील अफसर करीम शेख यांचे 10 ते 12 माणसाचे कुटुंब आहे रात्री झालेल्या पावसामुळे त्यांचे राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन बांधकामाचीही मोठी पडझड होऊन नुकसान झाले आहे. तर झोपडपट्टी येथील संपत एडके यांच्या घरावरील पत्रे उडून गेले यांच्या सह गावातील अनेक ठिकाणी लोकांचे घरावरील पत्रे उडून जाऊन घरांचे नुकसान झाले आहे.
वाऱ्याची येवढी मोठी तीव्रता होती की येथील विजरोधक पोल अक्षरशा मोडून पडला आहे. गावात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठी झाडे मोडून पडली पडली असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. गावातील रेशीम कीटक संगोपनग्रहाचा उभा करण्यात आलेला पत्रा असो किंवा कांद्यासाठी उभा करण्यात आलेले शेड संपूर्ण कोसळले आहे या झालेल्या पावसामुळे आर्थिक हानी झाली. मात्र, सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही.