उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव जवळ येत असून, यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. अवघ्या आठ दिवसांवर नवरात्र महोत्सव आल्याने मंदिर प्रशासनाने यात्रेकरूंसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यंदा 28 सप्टेंबरला घटस्थापना असून, तुळजाभवानी देवीचा उत्सव 15 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
नवरात्र महोत्सवासाठी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी - तुळजाभवानी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव जवळ येत असून, यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव जवळ येत असून, यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
शारदीय नवरात्र उत्सवात संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापुरात दर्शनासाठी दाखल होत असतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासन, एस.टी.महामंडळ, स्थानिक आरोग्य विभाग, महावितरण, नगर परिषद यांनी तयारी सुरू केली आहे. उत्सवादरम्यान दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सेवेसाठी नगरपरिषदेच्या वतीने हंगामी दर्शन मंडप, प्रथमोपचार केंद्र, पाणपोई तसेच विसावा कक्ष स्थापन करण्यात येत आहे.