धाराशिव (उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने 'अश्लील' कपडे घालून मंदिरात येण्यावर बंदी घातली होती, नंतर आता लगेच मंदिर प्रशासनाने यू-टर्न घेतला आहे. असभ्य कपड्यांविरोधातील आदेशानंतर लागू केलेल्या नियम काही तासांनंतर हटवला आहे. प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिराच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, भाविकांवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. तुळजापूर हे शतकानुशतके जुने मंदिर दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते. मंदिरात दर्शनासाठी किंवा पूजेसाठी येणाऱ्या भाविकांवर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.
काय होता तो फलक -तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनाच्यावतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेले अशा भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही असे म्हटले होते. ड्रेसकोडबाबतचे नियम आजच लागू करण्यात आले. या नियमांची पूर्वकल्पना भाविकांना देण्यात आली नाही. अचानकपणे लागू करण्यात आलेल्या नियमांचा फटका भाविकांना बसला.
काय होता नियम - मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट प्ॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाहीड आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम लागू करण्यात आले होते. त्यानंतर मोठा गदारोळ झाला.