उस्मानाबाद- शहरात वाढलेल्या अतिक्रमणावर आज जेसीबी चालवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे अतिक्रमण वाहतूक विभागाकडून काढण्यात आले. मुख्य रस्त्याच्या फूटपाथवर चहाच्या टपरी, फळविक्रेते, झेरॉक्स दुकाने थाटण्यात आली होती. मात्र, शहर वाहतूक शाखेने अतिक्रमण हटाव मोहीम हातात घेऊन हे अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे.
वाहतुकीस अडथळा; शहराच्या मुख्य चौकातील अतिक्रमण हटवले - जेसीबी
शहरात अतिक्रमण वाढल्याने चालणेही कठीण जात होते. याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतर वाहतूक शाखेने शहरातील मुख्य चौकातील अतिक्रमण हटवले आहे.
अतिक्रमण हटवताना पोलीस
रस्त्यावरच नागरिक चहा टपरीवर उभे असायचे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना अडथळ्यातून वाट काढावी लागत होती. तर शहरातील मुख्य चौकातही वाहतूक कोंडी होत होती. त्यावर फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझन्सच्या वतीने शहर वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेने अतिक्रमण हटाव मोहीम हातात घेतली आहे.