उस्मानाबाद - जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळाची परस्थिती आहे. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही भीषण दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी २ पर्यंत उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
शरद पवारांचा उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा
जिल्ह्यातील ही भीषण दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी २ पर्यंत उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
शरद पवारांचा उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा
जिल्ह्यातील भूम तालुक्यातील घाटपिंपरी, कळंब तालुक्यातील चोराखळी आणि उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी या गावांना भेटी देऊन शेतीची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून जिल्ह्यातील चारा छावण्या, टँकर तसेच अधिग्रहण, बोअर, विहिरी यांची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.