उस्मानाबाद - आजपासून शैक्षणिय सुरुवात झाली असून पालक आपल्या पाल्यांना शाळेत घेऊन जात आहेत. काही शाळा प्रशासनाकडूनही तर विद्यार्थ्यांचे स्वागत फुल देऊन करण्यात येत आहे. सध्या जिल्हा परिषद शाळा गजबजून गेल्या आहेत. आज जिल्ह्यातील काही गावामध्ये शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसवून मिरवणूक काढण्यात आली.
'स्कूल चले हम'! विद्यार्थ्यांची सजलेल्या बैलगाडीतून ढोल-ताश्याच्या गजरात मिरवणूक - शाळा
आजपासून शैक्षणिय सुरुवात झाली असून पालक आपल्या पाल्यांना शाळेत घेऊन जात आहेत. काही शाळा प्रशासनाकडूनही तर विद्यार्थ्यांचे स्वागत फुल देऊन करण्यात येत आहे.
आज शाळेचा पहिला दिवस असल्याने जिल्ह्यातील अनेक गावामध्ये महिलांनी आपल्या घराच्या दारासमोर शेणाचा सडा टाकून रांगोळी काढली होती. तसेच जिल्हा परिषद शाळा प्रशासनकडूनही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सजलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांना शाळेला पाठवण्यात आले. यामुळे दोन महिन्यांच्या सुट्ट्यानंतर आज जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेल्या होत्या.
काही ठिकाणी तर ढोल ताशे वाजवत विद्यार्थ्यांची गावात मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला नारळांच्या पानांचे तोरही बांधण्यात आले होते. गावात मिरवणूक काढत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यात आले तेव्हा शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना फुल देऊन स्वागत करण्यात आले.