उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजभवानीच्या मंदिरात रंगपचमीच्या निमित्ताने रंगांची उधळण करण्यात आली. होळीनंतर चौथ्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात आली. आज सकाळी तुळजाभवानीचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर देवीला पांढरी साडी नेसवली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले सोन्याचे अलंकार घालून फुलांचा हार घालून देवीला सजवण्यात आले.
'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात रंगोत्सव - रंगपंचमी उत्सव तुळजाभवानी मंदिर
आज सकाळी तुळजाभवानीचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर देवीला पांढरी साडी नेसवली जाते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले सोन्याचे अलंकार घालून फुलांचा हार घालून देवीला सजवले जाते.
देवीला नैवेद्य दाखवून धूप, आरती झाल्यानंतर गाभाऱ्यात 'आई राजा उदे उदे'चा जयघोष करत तुळजाभवानी मंदिरात वेगवेगळ्या रंगांची उधळण करण्यात येते. देवीचे महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, भोपे पुजारी, संजय सोंजी यांनी तुळजा भवानीच्या मूर्तीवर वेगवेगळ्या रंगाची उधळण केली. पाण्याची बचत व्हावी म्हणून देवीला कोरडे रंग लावण्यात आले. तुळजाभवानी मातेला रंग लावल्यानंतर पुजारी व स्थानिकांनी रंगपंचमी खेळायला सुरुवात केली. नेहमी तुळजा भवानी मातेला रंग लागत नाही तोपर्यंत तुळजापूरकर आणि पंचक्रोशीतील नागरिक देखील पंचमी साजरी करत नाही.