महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता - Manisha giri

शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनिषा गिरी यांनी ३१ मे रोजी सकाळी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी यांचे वडील रामदत्त गिरी

By

Published : Jun 11, 2019, 10:45 PM IST

उस्मानाबाद- शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनिषा गिरी यांनी ३१ मे रोजी सकाळी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागत असून त्यांना वरिष्ठांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले असल्याचे सांगत मनीषा गिरी यांचे वडील रामदत्त गिरी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी यांचे वडील रामदत्त गिरी यांची प्रतिक्रिया

वरिष्ठांच्या जाचामुळे माझ्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसून वरिष्ठ पोलीस निरीक्षक खाडे, पोलीस वाहन चालक आशिष ढाकणे आणि त्यांचे अन्य दोन सहकारी या चौघांनी माझ्या मुलीला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

वरील लोकांनी माझ्या मुलीचा लैंगिक छळ केला. त्यामुळे माझ्या मुलीने तक्रार दिली होती. तक्रार दिल्याने माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रामदत्त गिरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पोलिस उपनिरीक्षक मनिषा गिरी यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना सोलापूर येथे हलविण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details