उस्मानाबाद - शहरात सुरू असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस होता. या संमेलनातील विविध कार्यक्रमांचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना अरेरावी करत पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
साहित्य संमेलनस्थळी गोंधळ.. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की
संमेलनस्थळी गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळाचे वार्तांकन करत असलेल्या पत्रकारांना पोलिसांनी अरेरावी केली. तर एका खासगी वृत्त वाहिनीचे पत्रकार मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले.
साहित्य संमेलनातील मंडप क्रमांक 1 मध्ये परिसंवाद कार्यक्रम सुरू होता. या ठिकाणी जगन्नाथ पाटील (रा.चाकूर, लातुर) यांनी भूमिका मांडायची असल्याचे सांगत, परिसंवाद कार्यक्रमात बोलू देण्याची विनंती केली होती. यामुळेच संमेलनस्थळी गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळाचे वार्तांकन करत असलेल्या पत्रकारांना पोलिसांनी अरेरावी केली. तर एका खासगी वृत्त वाहिनीचे पत्रकार मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले.
हा सर्व प्रकार घडल्यामुळे साहित्य संमेलनात वादाची परंपरा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.