उस्मानाबाद-कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जााहीर केला आहे. मात्र, यानंतरही संपूर्ण बाजारपेठ बंद असूनदेखील लोक सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. अशांना आता उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यास कळंबमधील पोलिसांनी सुरुवात केली आहे.
लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात महिला अधिकारी रिंगणात
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, यानंतरही संपूर्ण बाजारपेठ बंद असूनदेखील लोक सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. अशांना आता उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यास कळंबमधील पोलिसांनी सुरुवात केली आहे.
विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाकडून आणि शासकीय अधिकार्यांकडून लोकांना वारंवार घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय पोलिसांकडून लाठीचार्ज होत असतानादेखील लोक ऐकायला तयार नाहीत. किराणा खरेदी करायचे आहे, गोळ्या संपल्या आहेत, दुध आणायचे असे विविध कारणे सांगून लोक बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसत आहे.
अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळयांनी आज स्वतःच रस्त्यावरती उतरून बाहेर फिरणाऱ्या लोकांना चोप देत उठाबशा काढायला लावल्या. गाठाळ यांनी संपूर्ण शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत लोकांना घरी बसण्याचे आवाहन केले. त्यामुळे, नाईलाजास्तव का होईना कळंबकरांना घरी थांबावे लागेल.