उस्मानाबाद- जिल्ह्यातील तुळजापूर येथे युवासेनेच्या तालुका प्रमुखाने पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे. त्यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
युवासेनेच्या तालुका प्रमुखाकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण - उस्मानाबाद
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या हॉटेलच्यासमोर रस्त्यावर गाड्या का लावल्या? असे पोलिसांनी युवासेनेचे तालुका प्रमुख रोचकारी यांना विचारले. त्यानंतर रोचकारी आणि त्यांच्या मित्रांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करायला सुरुवात केली.
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या हॉटेलच्यासमोर रस्त्यावर गाड्या का लावल्या? असे पोलिसांनी युवासेनेचे तालुका प्रमुख रोचकारी यांना विचारले. त्यानंतर रोचकारी आणि त्यांच्या मित्रांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करायला सुरुवात केली. पोलिसांनी रोचकारीसह २ कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. त्यामुळे सहाय्यक पोलीस उपाध्यक्षक संदिप घुगे यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मागवला आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते.