उस्मानाबाद - विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात पाल आढळून आली आहे. ही खळबळजनक घटना उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. शाळेत एकुण २६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळली पाल हेही वाचा - लंबी रेस का घोडा’... मिस्टर क्लिन मुख्यमंत्र्यांची राजकीय घोडदौड जोरात
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुपारच्या जेवणाच्यावेळी चौथीत शिकणाऱ्या तृप्ती किशोर वाडीकर या विद्यार्थिनीच्या भातात पाल आढळून आली. घरी नेलेला भाताचा डब्बा उघडून पाहिल्यानंतर तिला डब्ब्यात पाल दिसली. लगेचच तिने पालकांच्या निदर्शनास ही बाब आणुन दिली. पालकांनी सदर घटनेची माहीती मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षाला भ्रमणध्वनी वरुन दिली.
हेही वाचा - पीएमसीच्या खातेदारांना दिलासा; खात्यामधून १० हजार रुपयापर्यंत काढता येणार रक्कम
मध्यान्ह भोजन शालेय पोषण आहार अधिक्षक व्ही जी राठोड व विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी शाळेत येऊन या घटनेचा पंचनामा केला. शाळेतील होणाऱ्या गंभीर घटनेच्या ग्रामस्थामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून गावातील पालकांनी शाळेत ठिय्या मांडला होता. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन भात प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. कुठल्याच विद्याार्थ्याना त्रास झाल्याची तक्रार नाही यामूळे मोठा अनर्थ टळला आहे.