महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, उस्मानाबादेत स्वस्त धान्य दुकानांवर लोकांची गर्दी

कोरोनाचा सामना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून लोकांना एकमेकांपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. मात्र तरीही लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

osmanabad people do not follow social distancing
सोशल डिस्टंन्स गेला खड्ड्यात, स्वस्त धान्य दुकानावर लोकांची गर्दी

By

Published : Apr 4, 2020, 8:50 PM IST

उस्मानाबाद- कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या दरम्यान उस्मानाबाद शहरातील दर्गा रोडवरील, स्वस्त धान्य दुकान क्रमांक 12मध्ये, धान्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

कोरोनाचा सामना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून लोकांना एकमेकांपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. मात्र तरीही लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

स्वस्त धान्य दुकानदार विजया उज्ज्वलसिंहराजे यांनी धान्य दुकान उघडल्यानंतर, धान्य खरेदी करण्यासाठी लोकांची एकच गर्दी केली. यावेळी लोकांना सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगण्यात आले. पण, लोक ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे लोकांना कोरोनाचे गांभीर्य आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा -उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी मृत घोषित केलेला संभाव्य रुग्ण जिवंत?

हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात महिला अधिकारी रिंगणात

ABOUT THE AUTHOR

...view details