महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबाद लोकसभा : ओमप्रकाशराजे निंबाळकर १ लाख २६ हजार मतांनी विजयी - तुळजापूर

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी ६३.४२ टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी आघाडीकडून राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील मैदानात होते. तर युतीकडून ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन सलगर हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

उस्मानाबाद लोकसभा LIVE: दोन भावांच्या लढतीत कोण मारणार बाजी? थोड्याच वेळात होणार स्पष्ट

By

Published : May 23, 2019, 6:16 AM IST

Updated : May 23, 2019, 9:32 PM IST

  • ०६ : ०० - १ लाख २६ हजार मतांनी ओमराजे निंबाळकर विजयी
  • ४:०९ -ओमराजे १ लाख ११ हजार मतांनी आघाडीवर
  • ३:४० -ओमराजे निंबाळकर ९८ हजार मतांनी आघाडीवर
  • १:५१ -ओमराजे निंबाळकर ८२ हजार १९७ मतांनी आघाडीवर
  • १२:४८ - ओमराजे निंबाळकर ५९ हजारांनी आघाडीवर
  • ११:५० - ओमराजे निंबाळकर ३७ हजार मतांनी आघाडीवर
  • १०:५९ - पाचवी फेरी पूर्ण, शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर २४ हजार ६४५ मतांनी आघाडीवर
  • १०:१४ -उस्मानाबादमध्ये शिवसेना १४ हजार मतांनी आघाडीवर
  • ९:५० - ओमप्रकाशराजे निंबाळकर दुसऱ्या फेरीत आघाडीवर
  • ८:५० - उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमप्रकाशराजे निंबाळकर आघाडीवर
  • ८.००- प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात
  • ७.४५- उमेद्वारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात दाखल
  • ७.३०- मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल जामर कार्यान्वित
  • ७.००- मतमोजणी अधिकारी व कर्मचारी मतमोजणी केंद्रावर दाखल. तयारी पूर्ण
    उस्मानाबाद लोकसभेच्या मतमोजणीला सुरूवात

उस्मानाबाद- उस्मानाबाद लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शहरातील गर्व्हर्नमेंट पॉलिटेक्निल बिल्डिंग याठिकाणी मतमोजणी झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी ६३.४२ टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी आघाडीकडून राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील मैदानात होते. तर युतीकडून ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन सलगर हे निवडणूकीच्या रिंगणात होते.

या मतदार संघात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, कळम-उस्मानाबाद, उमरगा-लोहारा, भूम-वाशी-परांडा या ४ विधानसभा क्षेत्रांचा तर लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी अशा ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामध्ये २ चुलत भावांमध्येच लढत होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व असल्याने राणा जगजितसिंह यांना ही निवडणूक सोपी असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ओमप्रकाशराजे निंबाळकर हेच खासदार होतील, असा दावा शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, उस्मानाबादच्या जनतेने मतांचा कौल कोणाच्या पारड्यात टाकला आहे, हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी ६३.६५ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या पद्मसिंह पाटील यांचा तब्बल २ लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. त्यामुळे कधीकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली होती.

Last Updated : May 23, 2019, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details