महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्क फ्रॉम होम सोबतच "फार्म वर्क" करणारे उस्मानाबादचे इंजिनिअर बंधू!

नोकरीच्या निमित्ताने दोघांनीही परदेशातही वास्तव्य केले आहे. यादरम्यानच दोघांनीही परदेशातील शेतीचे बारकाईने निरीक्षण करत तिथल्या आधुनिक शेतीच्या पद्धती समजून घेतल्या. सध्याही ते अमेरिकेतील नामांकीत कंपनीसाठी भारतातून काम करतात. कोरोना संकटातील लॉकडाऊनमुळे दोघेही भाऊ सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे दोघेही सध्या गावातूनच आपले काम करत आहेत. हे करत असतानाच उरलेल्या वेळात शेतीत आई-वडिलांना मदत करण्यास त्यांनी सुरूवात केली आणि शेतीत वेगवेगळे प्रयोग ते राबवायला लागले.

वर्क फ्रॉम होम सोबतच "फार्म वर्क" करणारे उस्मानाबादचे इंजिनिअर बंधू!
वर्क फ्रॉम होम सोबतच "फार्म वर्क" करणारे उस्मानाबादचे इंजिनिअर बंधू!

By

Published : Aug 3, 2021, 1:02 PM IST

Updated : Aug 3, 2021, 3:54 PM IST

उस्मानाबाद : लॉकडाऊनदरम्यान वर्क फ्रॉम होम करत असतानाच माळरानावर नंदनवन फुलविण्याची किमया उस्मानाबादमधील दोन इंजिनिअर भावांनी करून दाखविली आहे. पंकज कावळे आणि उदय कावळे अशी या भावांची नावे असून त्यांची शेती करण्याची जिद्द सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

वर्क फ्रॉम होम सोबतच "फार्म वर्क" करणारे उस्मानाबादचे इंजिनिअर बंधू!

वर्क फ्रॉम होमसोबत शेतातही काम

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील बावी इथे राहणाऱ्या प्रकाश कावळे यांची पंकज आणि उदय ही दोन्ही मुले इंजिनिअर आहेत. नोकरीच्या निमित्ताने दोघांनीही परदेशातही वास्तव्य केले आहे. यादरम्यानच दोघांनीही परदेशातील शेतीचे बारकाईने निरीक्षण करत तिथल्या आधुनिक शेतीच्या पद्धती समजून घेतल्या. सध्याही ते अमेरिकेतील नामांकीत कंपनीसाठी भारतातून काम करतात. कोरोना संकटातील लॉकडाऊनमुळे दोघेही भाऊ सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे दोघेही सध्या गावातूनच आपले काम करत आहेत. हे करत असतानाच उरलेल्या वेळात शेतीत आई-वडिलांना मदत करण्यास त्यांनी सुरूवात केली आणि शेतीत वेगवेगळे प्रयोग ते राबवायला लागले.

दोन्ही भावांपैकी उदय कावळे हे गेल्या 15 वर्षांपासून सिव्हिल इंजिनिअर म्हणून नोकरी करत आहेत. मूळ फ्रांस येथील पेट्रोलियम कंपनीच्या मुंबईतील प्लान्टमध्ये ते कार्यरत आहेत. तर पंकज कावळे यांनी इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशनमध्ये बिटेक केले आहे. गेल्या 12 वर्षांपासून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून अमेरिकेतील ट्विस्का सोल्युएशन या कंपनीत ते कार्यरत आहेत.

मामांकडून मिळाली प्रेरणा

दोघांचेही मामा पंडित रामचंद्र पटने हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी निवृत्तीनंतर शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवून चांगले आर्थिक उत्पन्न मिळविले आहे. त्यांच्याकडूनच दोन्ही भावांना शेतीसाठी प्रेरणा मिळाली आणि लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करत असतानाच त्यांनी शेतीतही लक्ष घातले.

वडिलोपार्जित शेतीवर वेगवेगळे प्रयोग

कावळे कुटुंबियांकडे वडिलोपार्जित 20 एकर शेती आहे. त्यापैकी 3 एकर क्षेत्रावर सीताफळ, एक एकरावर आंबा, एक एकरावर जांभूळ आणि 2 एकर क्षेत्रावर चिंचेची लागवड केली आहे. यासोबतच पोखरा योजनेअंतर्गत 1 एकर क्षेत्रावर शेडनेट आणि 1 एकरवर शेततळे बनविले. शेडनेटमध्ये कोथिंबीर, ढोबळी मिरचीची लागवड करून त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. याशिवाय 10 एकर क्षेत्रावर सोयाबीन, ज्वारी आणि हरभरा ही पिके ते घेतात. यासह शासनाच्या योजनेअंतर्गत 13 शेतकऱ्यांचा गट बनवून अवजार बँकेचीही स्थापना त्यांनी केली आहे. याशिवाय शेळीपालनालाही त्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे शेती करण्याची त्यांची ही जिद्द सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

तरुणांपुढे निर्माण केला आदर्श
विदेशात चांगल्या पगाराची नोकरी असूनही मुलांचा शेतीविषयीचा लळा पाहून कुटुंबीयही समाधानी आहेत. मुलांनी नोकरीनंतर शेती करावी अशी इच्छा प्रकाश कावळे यांनी बोलून दाखविली आहे. एकीकडे गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत असतानाच दुसरीकडे शेतात नांगर धरून या भावंडांनी आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी दूरवरून लोक येत आहेत.

हेही वाचा -कोरोनाचा मोठा फटका; बाजारपेठा बंद असल्यामुळे पाच एकरातील टरबूज जनावरांच्या दावणीला

Last Updated : Aug 3, 2021, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details