महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमरग्यात डान्सबारमध्ये एकाला मारहाण, बार चालकावर गुन्हा दाखल

15 ऑगस्टच्या मध्यरात्री डान्सबारमध्ये रात्री तुफान हाणामारी झाली. बार चालक विजय गायकवाडसह इतर दोन जणांनी मारहाण केल्याप्रकरणी उमरगा पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीमुळे डान्सबारचा प्रकार उघड झाला असून, कारवाई करताना मात्र पोलिसांनी डान्सबारचा उल्लेख टाळला आहे.

osmanabad crime news a man got beaten up by dance bar owner in umarga case filed

By

Published : Aug 15, 2019, 8:31 PM IST

उस्मानाबाद - उमरगा परिसरात हॉटेल सौदागरमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारची छमछम सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी या बारमध्ये बारचालकाने एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर ड्राय-डे असताना देखील हा डान्सबार सुरू होता. तसेच सोशल मीडियावर या डान्सबारमध्ये पैसे उधळले जात असल्याच्या क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. राजेंद्र जाधव असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

डान्सबारमध्ये एकाला मारहाण, बार चालकावर गुन्हा दाखल

15 ऑगस्टच्या मध्यरात्री डान्सबारमध्ये रात्री हाणामारी झाली. त्यावेळी राजेंद्र यांच्याकडून १ लाख रुपये काढून घेतले असल्याचा आरोपही करण्यात आला. या प्ररकरणी बार चालक विजय गायकवाडसह इतर दोन जणांवर उमरगा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीमुळे डान्सबारचा प्रकार उघड झाला असून, कारवाई करताना मात्र पोलिसांनी डान्सबारचा उल्लेख टाळला आहे. पोलिसांनी हा बार बंद करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details