उस्मानाबाद-उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोनाबाधित रुग्ण दवाखान्यात गैरवर्तन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णावर सध्या उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उस्मानाबादमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाकडून गैरवर्तन, वैद्यकीय अधीक्षकांनी दिली तक्रार - उस्मानाबाद कोरोना बातमी
उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोनाबाधित रुग्ण दवाखान्यात गैरवर्तन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णावर सध्या उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
osmanabad corona patient
हा रुग्ण रुग्णालयातील व्हिडीओ काढणे, वारंवार फोन करणे, असे गैरप्रकार करत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. या रुग्णास वारंवार समज देण्यात येऊनही तो हे कृत्य करत आहे, त्यामुळे रुग्णालय प्रशासन चांगलेच त्रस्त झालेले असून त्यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे.