महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादेत योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन - Kailas Chaudhari

उत्तर प्रदेश येथील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी यांना अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे आज उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसने उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा करून जाळून निषेध केला.

उस्मानाबादेत योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करताना काँग्रेस पदाधिकारी

By

Published : Jul 20, 2019, 8:24 PM IST

उस्मानाबाद - उत्तर प्रदेश येथील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी यांना अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे आज उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसने उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा करून जाळून निषेध केला.

उस्मानाबादेत योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करताना काँग्रेस पदाधिकारी


सोनभद्रा येथे जमिनीच्या वादातून येथील सरपंच यज्ञदत्त याने साथीदारांना घेऊन गोंड समाजातील लोकांवर गोळीबार केला होता. यात दहा जणांचा मृत्यू झाला. या मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या. त्यावेळी त्यांना वाराणसी-मिर्झापूर सीमेवर त्या कुटुंबाला भेटण्यासाठी अडवून चुनार येथील विश्रामगृहात नजर कैदेत ठेवण्यात आले. याचा निषेध म्हणून उस्मानाबाद येथे आज उत्तर प्रदेश सरकार विरोधात घोषणा देत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा पुतळा जाळण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details